तो क्षण

फुलांच्या पाकळ्या खुलल्या होत्या, क्षण अलगद उचलत होते आणि त्या धबधब्यासारख्या वाहणाऱ्या जलाशयातले शब्द जणू अपरिहार्य ठरत होते. प्रत्येकाच्या आयुष्यातला तो क्षण नेहमीच खास असतो; माझ्याही आयुष्यात होता आणि अजूनही आहे. क्षणिक होतं ते जगणं आणि क्षणिक होता तो क्षण, पण खूप काही शिकावं त्याकडून असे नेहमीच मागे वळल्यानंतर वाटते. तो क्षण जीवनी सामावतांना आपण या स्पर्धेत शेवटचे आहोत का? असा प्रश्न साहजिकच उमगतो. तो दिवस संस्कृती आश्रमातला; ते अनाथांचे आणि साक्षात आरसे सनाथांचे. शरीर व मन दोघी सुदृढ असूनही कमजोर विचारांचे पांघरून माणसाने पांघरले तर जणू जगात आपणच सर्वदुःखी आहोत असे परस्परी बिंबावते. त्या दिवशी संस्कृती आश्रमातला भयंकर आणि थाट आचारी होता. सुरुवातीला तेथील मुलामुलींशी संवाद करताना थोडी भीती होती पण काय माणसाच्या हसण्यात एवढी ताकद! जे हसू अस्र म्हणून वापरता येते. संस्कृती आश्रमातील ते मुलं काही बाबींमध्ये समाजातून दुरावलेले असूनही ते संघटित होते. इतरांच्या नजरा त्यांच्याबद्दलच्या त्यांना अवगत होत्या पण डोळ्यात मात्र त्यांच्या तेच निरागसपण होतं, जे बघतांना माझे डोळे दिपून गेलेत. संस्कृती आश्रमात खरंच संस्कृती होती या जिवलग्यांची. तिथली ती तेजोदीप मुलं-मुली हसमुख होती पण त्या मुखवट्यामागे विशाल दुःखाचा महासागर शिथिल होता. त्यांनाही हसण्याचा हक्क, रडण्याचा रुसवा, हट्ट धरण्याचा हेवा आणि निडर होऊन जगण्याचा अधिकार आहेच. पण अधिकारांचे सांत्वन होत असताना बेफिकीर बुद्धीला तलफ लागते त्या गळत्या छपराची. आपण एकटे आहोत, आपली असणारी अशी कोणती नाती नाहीत; हे माहीत असताना देखील कोणत्याही इतर सनाथ मुलांबद्दल त्यांच्या मनात तसुभर सुद्धा त्वेष, तिरस्कार नव्हताच त्या अनाथ मुलांची बुद्धिमत्ता तल्लख, नाविन्यपूर्ण, कल्पक कृतीरचना, कलाकृती भिन्नविभिन्न अजीर्ण होत्या. अनाथ हा शब्द कदाचित त्या मुलांच्या कमतरतेचे गाडे ओढणारे नाव होते पण ते सनाथ होते त्यांच्या हुशारीने. नक्कीच, पुढे जाऊन त्या मुलांनी यश संपादन केले असेलच. न असणाऱ्या नेहमी, न घडणाऱ्यांकडे लक्ष देऊन आपणच आपल्या यशाचा मार्ग चुकवतो. शिल्लक व क्षुल्लक गोष्टींची कार्यतत्परता तितकीच यशस्वी ठरते ही गोष्ट कायम स्मरणात असेलच. माझ्या त्या संस्कृती कला दृष्टिक्षेपातील प्रकृतीने त्या लोकांची केलेली मस्करी निस्तरत असलेल्या व्यक्तींची अवहेलना करणारी लोकं 21 व्या शतकातील रावणच असतात. एखाद्या व्यक्तीत कमतरता असणे हे नैसर्गिक आहे पण तो कमीपणा त्यांची दुर्बलता आहे असे नाही. नियतीचा आघात व आई-वडिलांची अधुरी साथ यामुळे पार खचलेले ते जीव आक्रोश करतात त्या निरव शांततेत, त्यांना कोणत्याही सहानुभूतीच्या कारंजा अपेक्षित नसतात. सहानुभूती चांगली पण मात्र त्याचा स्पष्ट अर्थ आपुलकीच असावा. अनाथांची माय होतांना माई सिंधुताईंनी केलेला अट्टहास ताकदीचा आणि अकल्पनीय होता. थोडेसे का होईना जिगर देवू करू. आपल्या भरल्या ओंजळीतील घास शेअर करू. अनाथ शब्द आयुष्याच्या शब्दकोशातच असायला नको या रीतीने प्रेम-जिव्हाळा यांची समर्पकता दाखवायला हवी. खरंच तो क्षण......


एक क्षण बदलून गेल्या दिशा दाही,
बहरले त्याने प्रेम ठाई ठाई....
अनाथ सनाथांचे नाते नवे असेना,
निखळ आयुष्याची ही खुलता कळी खुलेना....

Comments