Posts

तो क्षण

फुलांच्या पाकळ्या खुलल्या होत्या, क्षण अलगद उचलत होते आणि त्या धबधब्यासारख्या वाहणाऱ्या जलाशयातले शब्द जणू अपरिहार्य ठरत होते. प्रत्येकाच्या आयुष्यातला तो क्षण नेहमीच खास असतो; माझ्याही आयुष्यात होता आणि अजूनही आहे. क्षणिक होतं ते जगणं आणि क्षणिक होता तो क्षण, पण खूप काही शिकावं त्याकडून असे नेहमीच मागे वळल्यानंतर वाटते. तो क्षण जीवनी सामावतांना आपण या स्पर्धेत शेवटचे आहोत का? असा प्रश्न साहजिकच उमगतो. तो दिवस संस्कृती आश्रमातला; ते अनाथांचे आणि साक्षात आरसे सनाथांचे. शरीर व मन दोघी सुदृढ असूनही कमजोर विचारांचे पांघरून माणसाने पांघरले तर जणू जगात आपणच सर्वदुःखी आहोत असे परस्परी बिंबावते. त्या दिवशी संस्कृती आश्रमातला भयंकर आणि थाट आचारी होता. सुरुवातीला तेथील मुलामुलींशी संवाद करताना थोडी भीती होती पण काय माणसाच्या हसण्यात एवढी ताकद! जे हसू अस्र म्हणून वापरता येते. संस्कृती आश्रमातील ते मुलं काही बाबींमध्ये समाजातून दुरावलेले असूनही ते संघटित होते. इतरांच्या नजरा त्यांच्याबद्दलच्या त्यांना अवगत होत्या पण डोळ्यात मात्र त्यांच्या तेच निरागसपण होतं, जे बघतांना माझे डोळे दिपून गेलेत. संस्क...